श्री देव कलेश्वर मंदिर महाशिवरात्री उत्सवाचे कार्यक्रम जाहीर

कुडाळ : नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे यावर्षी महाशिवरात्र शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त मंगळवार, १४ फेब्रुवारीपासून कलेश्वर मंदिर येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
यामध्ये १४ फेब्रुवारी २०२३ रोजी, सकाळी ७ वाजता महारुद्र प्रारंभ, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होईल. तर रात्री ८ वाजता पुराण-पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक दिनू मेस्त्री), रात्री १० वाजता हभप भाटीवडेकर बुवा यांचे कीर्तन होईल.
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता महारुद्र (श्री देव गावडोबा, श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ अभिषेक पूजन, श्री देवी सातेरीकडे कुंकूमार्चन आणि सप्तशती पाठ) असे कार्यक्रम होतील. तर दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते संध्याकाळी ७ चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण (देवेंद्र नाईक), तर रात्री ८ वाजता पुराण-पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक दिनू मेस्त्री), रात्री १० वाजता हभप भाटीवडेकर बुवा यांचे कीर्तन होईल.
तर १६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता महारुद्र समाप्ती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते संध्याकाळी ७ दशावतारी नाटक, मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ (बाळा कलिंगण प्रस्तुत), रात्री ८ वाजता पुराण-पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक दिनू मेस्त्री), रात्री १० वाजता हभप भाटीवडेकर बुवा यांचे कीर्तन होईल.
१७ फेब्रुवारी, सकाळी ७ वाजता, परिवार देवतांवर अभिषेक पूजन, दुपारी १ वाजल्यापासून वरदशंकर पूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते संध्याकाळी ७, कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर (कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत) यांचा नाट्यप्रयोग, रात्री ८ वाजता पुराण-पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक दिनू मेस्त्री), रात्री १० वाजता हभप भाटीवडेकर बुवा यांचे कीर्तन होईल.
शनिवार, १८ फेब्रुवारी, पहाटे ५ वाजता धार्मिक विधी, श्रींचे दर्शन, सायंकाळी ४ वाजता हभप भाटीवडेकर बुवा यांचे कीर्तन, रात्री १० वाजता पुराण-पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक दिनू मेस्त्री), रात्री १२ वाजता दशावतारी गणपती दर्शन श्रींचे वाजत गाजत रथापर्यंत आगमन, रात्री १२.३० वा. आकर्षक विद्युत रोषणाईसह श्रींची रथातून मिरवणूक, दशावतारी नाटकाचा उर्वरित भाग (कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर, कै. बाबी कलिंगण प्रस्तुत)
रविवार १९, फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता हभप भाटीवडेकर बुवा यांचे कीर्तन होईल, अशी माहिती श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार, उपसमिती नेरूर, अध्यक्ष आणि सचिव यांनी दिली आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!