आचरा ग्रामपंचायत वर शिवसेना ठाकरे गटाचाच भगवा फडकेल -तालुका प्रमुख हरी खोबरेकर

राज्यात केंद्रा सत्ता असतानाही भाजपला आचरे गावात उमेदवार तयार करता आला नाही म्हणून जिल्हा परिषदेचा उमेदवार सरपंच पदासाठी उभा करण्याची वेळ आल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे हे अपयश लोकांपर्यत पोहोचवतआचरा ग्रामपंचायत निवडणूक एकदिलाने लढून सर्व उमेदवार निवडून आणणार असल्याचे सांगितले.
लौकिक सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांबाबत माहिती दिली.यावेळी त्यांच्या सोबत बाबी जोगी,विनायक परब, प्रणया टेमकर,दिलिप कावले,नंदकिशोर सावंत, नारायण कुबल,शाम घाडी,समिर लब्दे यांसह अन्य शिवसैनिक ग्रामपंचायत उमेदवार प्रिया मेस्त्री, चंद्रशेखर मुणगेकर,पूर्वा तारी, सुकन्या वाडेकर, अनुष्का गांवकर, सचिन बागवे, श्रद्धा सक्रू, अनिकेत मांजरेकर, सचिन परब, सदानंद घाडी, युगंधरा मोरजे,चंदन पांगे, अमृता गांवकर, माणिक राणे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना खोबरेकर यांनी
सर्व सामान्यांचे नेतृत्व म्हणून मंगेश टेमकर यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दिली आहे.
पालकमंत्री, केंद्रीय मंत्री यांचे नेतृत्व कमी पडले म्हणून विरोधक मोदींचे नाव घेऊन मते मागत आहेत .
महागाई,वाढलेली बेरोजगारी, शैक्षणिक दुरावस्था असताना मोदींचा कोणता चेहरा घेऊन लोकांपर्यंत जाणार , विरोधक कोणतेही विकासात्मक काम करु शकले नाहीत
याउलट आमदार नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून यागावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.त्यामुळे आचरेगावावर ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा नक्की फडकेल असा विश्वास खोबरेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांनी गेली पंधरा वर्षे सरपंच, सदस्य म्हणून काम करत असताना लोकांच्या गरजा ओळखून काम केले .आपण केलेली विकासकामे लोकांच्या नजरेसमोर असल्याने आपणच निवडून येणार असल्याचे सांगितले




