पाट हायस्कूलच्या कलाकारांचा सन्मान

पाट हायस्कूलमध्ये बाबू जगजीवन राम यांच्या पुण्यस्मरणात विविध कला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये चित्रकला स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,निबंध लेखन स्पर्धा, एकल गायन स्पर्धा ,समूह गायन स्पर्धा या स्पर्धेमध्ये स्कूलच्या सर्व कलाकारांचा सहभाग होता. या कलाकारणाचा सन्मान करण्यात आला.
शानदार अशा कार्यक्रमाची सुरुवात सर्व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाली यावेळी संस्था कार्याध्यक्ष दत्ता साळगावकर दीपक पाटकर बाबा तळवडेकर . राजेश सामंत तसेच अध्यक्षपदी लेखिका वृंदा कांबळी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. सुधिर ठाकूर यांनीही सूचक असे मार्गदर्शन केले. विविध गीतांनी विविध नृत्यांनी कार्यक्रमांची रंगत वाढत गेली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती रितेश राऊळ जि प सदस्यां यज्ञा साळगावकर यांनी उपस्थिती लावली आणि कार्यक्रमाचा आनंद घेतला .
समता सामाजिक न्याय शिक्षण राष्ट्रीय एकात्मता हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबू जगजीवन राम यांच्या संघर्षमय जीवनातून नव्या पिढीला प्रेरणा देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धांमध्ये सहभाग न नोंदवता सामाजिक बांधिलकी राष्ट्रीय आणि समानतेच्या विचाराने उत्स्फूर्त प्रसिद्ध देत कार्यक्रमाला यश मिळवून दिले.
कार्यक्रमासाठी कलाशिक्षक संदीप साळस्कर कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत, समीर शिर्के, गौरी आडलकर, अमित पाटील, अमोल गुरम, ऋचा पेडणेकर, सानिया गावडे, पल्लवी भोगटे यांनीही विशेष मेहनत घेतली. विद्यालयातर्फे मुख्याध्यापक सयाजी बोंदर कलाशिक्षक संदीप साळसकर पर्यवेक्षिका अंकिता मोडक, जान्हवी पडते, सिद्धी चव्हाण, दीपिका सामंत यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!