शिवसेना ठाकरे गटाच्या नवरात्र उत्सवात फुगडी स्पर्धेने आणली रंगत

गेली अनेक वर्ष शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात येतात फुगडी स्पर्धा
भोंडला, हादगा, भुलाबाई या विविध नावाने नवरात्र उत्सवातील महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवदुर्गा उत्सव मंडपात नुकताच निमंत्रित संघाच्या फुगड्या खेळून जपण्यात आला. महिला आघाडीच्या सदस्यांनी हि भोंडल्या च्या फुगडीचा फेर धरला. बिडवाडी महिला फुगडी संघ, ओसरगाव लिंग माऊली फुगडी मंडळ गावठाण वाडी, बाळ गोपाळ हनुमान मित्र मंडळ फुगडी संघ कणकवली कांबळे गल्ली, स्वयंभू फुगडी संघ बांधकरवाडी कणकवली, श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ या पाच संघांनी फुगड्या सादर केल्या. सादरीकरणाला प्रेक्षकांमधूनही भरघोस बक्षीस देण्यात आली.
नाट्य आणि सिने क्षेत्रातील अभिनेते अभय खडपकर आणि नवरात्र मंडळाचे अध्यक्ष श्री रामू विखाळे यांनी फुगडी मंडळांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ वैदही गुडेकर,दिव्या साळगावकर, संजना कोलते, माधवी दळवी, स्वरूपा विखाळे,सुप्रिया जाधव,अश्विनी मोरये, रोहिणी पिळणकर , सौ. प्रतिभा अवसरे आदी महिला पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
कणकवली प्रतिनिधी




