कणकवलीत भर दिवसा फ्लॅट फोडून पावणे दोन लाखांची चोरी

पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

कणकवली शहरात भरदिवसा गजबजलेल्या वस्तीत रामेश्वर प्लाझा मधील दुसऱ्या मजल्यावर अज्ञात चोरट्याने दोन फ्लॅट फोडून चोरी केली.ही चोरीची घटना दुपारी १२ ते १.३० वाजताच्या मुदतीत घडली.डॉ.अशोक सदाशिव कदम हे बाजारात लाईट बिल भरण्यासाठी गेले असताना फ्लॅटमध्ये कडीकोयंडा तोडून कपाट फोडून तीन तोळे सोने,रोख १४ हजार ५०० रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.
अशोक कदम यांच्या घरातून कपाट फोडून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र ,गोल्ड कॉइन, कानातील कुडी जोड असे तीन तोळ्याचे दागिने सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे व १४ हजार २५० रुपयाची रोकड लंपास केली आहे. तसेच कदम यांच्या लगत असलेला सुभाष सावंत यांचा फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील ,पोलीस मिलिंद देसाई यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.तसेच चोरीनंतर ठसे तज्ञ पथक, श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. मात्र हायवेवर जाऊन श्वान भरकटले. या चोरीचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!