सिंधुदुर्ग मध्ये राजकोट येथे लाईट व साऊंड शो, व राजापूर वखारी साठी प्रत्येकी 5 कोटीचा निधी

पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिल्याची माजी आमदार प्रमोद जठारे यांची माहिती
राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत कोकणातील दोन प्रमुख मागण्यांबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये राजापूर वखारीच्या विकासाकरता निधी उपलब्ध करा व राजकोट सिंधुदुर्ग येथील शिवछत्रपती च्या उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या बाजूला लाईट व साऊंड शो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होण्यापूर्वी सुरू करावे अशी मागणी करण्यात आल्याची माहिती भाजपा लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. याबाबत श्री जठार म्हणाले राजापूर येथे ईस्ट इंडिया कंपनीची ब्रिटिशांनी जी पहिली वखार सुरू केली त्या राजापूर वखार च्या भागाच्या विकासाकरिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली. या मागणीला पर्यटनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती श्री. जठार यांनी दिली. तसेच 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण होणार. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत व्हावा असा लाईट व साऊंड शो सुरू करावा अशी मागणी मी पर्यटन मंत्रांकडे केल्याची माहिती श्री जठार यांनी दिली. या दोन्ही प्रकल्पासाठी प्रत्येकी 5 याप्रमाणे 10 कोटी रुपये देण्याची आदेश श्री महाजन यांनी दिल्याची माहिती श्री जठार यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/कणकवली