मातोंड-पेंडूर जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

लहान गटात प्राची परब तर गाव मर्यादित गटात दिव्या बागायतकर विजेत्या
प्रतिनिधी । कुडाळ : मातोंड-पेंडूर येथील एकेरी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत, लहान गटात प्राची परब तर गाव मर्यादितमध्ये दिव्या बागायतकर विजेत्या ठरल्या.
मातोंड-पेंडूर गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून समस्त गावकर मंडळी व श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळ, मातोंड यांच्या वतीने जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व मातोंड पेंडुर गावमर्यादीत स्पर्धा आयोजन श्री देवी सातेरी रंगमंचावर करण्यात आले होते स्पर्धेचे उद्याटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. जिल्हास्तरीय खुला गट प्रथम मृणाल सावंत, द्वितीय प्रयेश पवार व समर्थ गवंडी, तृतीय जयेश सोनुर्लेकर व नंदिनी बिले, लहान गट प्रथम प्राची परब, द्वितीय सृष्टी पवार, तृतीय माही सावंत, गाव मर्यादित प्रथम दिव्या बागायतकर, द्वितीय अन्वी गावडे व प्रांजल रेडकर, तृतीय उत्कर्षा कवठणकर यांनी मिळविला.
स्पर्धेचे परीक्षण ओंकार परब व गीतांजली मातोंडकर यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण वेळी पंचायत समिती माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, मंडळाचे सदस्य महेश वाडाचेपाटकर, रविकिरण परब ,पत्रकार महेंद्र मातोंडकर दिपेश परब, नितीन परब, प्रशांत परब, देवदास परब, सागर परब, देवेश परब, देवेंद्र परब, राजन परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.