सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाची ची अंदाधुंदी

कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच हेल्मेट न वापरल्याबद्दल दंड

आरटीओ काळे म्हणतात शासनाचे आदेश

युवासेना व युवा मोर्चा यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती

सिंधुदुर्ग जिल्हा आरटीओ कार्यालयाचा अंदाधुंदी कारभार समोर आला असून, तहसीलदार कार्यालयात आपल्या कामानिमित्त येणाऱ्या दुचाकी स्वारांना तहसीलदार कार्यालय गेटच्या आत मधील परिसरात थांबवून पाचशे रुपये पासून ते तब्बल पाच हजार रुपयाच्या दंडात्मक कारवाईच्या पावत्या फाडल्या जात आहेत. व ही रक्कम येत्या पाच दिवसात भरणा करा असा मेसेज देखील आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, सचिन सावंत, तेजस राणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, संतोष पुजारे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत प्रश्नांची सरबत्ती केली. व त्यापाठोपाठ युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, समीर प्रभूगावकर, निखिल आचरेकर, यांच्यासह पदाधिकारी दाखल झाले. व तहसीलदारां समोर अक्षरशा आरटीओच्या अधिकाऱ्यांची चिरफाड केली. सुरुवातीला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कारवाई करण्याची आम्हाला तहसीलदार यांच्याकडून परवानगी आहे असे सांगणाऱ्या आरटीओच्या त्या दोन अधिकाऱ्यांनी घुमजाव करत आम्हाला शासनाचे आदेश आहेत असे सांगितले. त्यानंतर तेथे दाखल झालेले पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी देखील याप्रकरणी मध्यस्थी करत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणी आरटीओ चे अधिकारी अरेरावीच्या भाषेत बोलत असताना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी आवाज खाली करून बोला असा इशारा दिला. तर याप्रसंगी आमदार नितेश राणे यांनी सांगितली की कारवाई थांबते. नितेश राणेंच्या इशाऱ्यावर कारवाई सुरू होते. मग ही कारवाई कणकवलीतच का? जिल्हाभरात ही कारवाई का करत नाही असा सवाल करत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तर कारवाई करत असताना पक्षपतिपणा करू नका तुम्हाला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात येऊन कारवाईचे अधिकार कोणी दिले? असतील तर आदेश दाखवा. अन्यथा तहसीलदारांसमोर उभे राहून चूक मान्य करा. व ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली ती मागे घ्या अशी आक्रमक भूमिका कन्हैया पारकर यांनी घेतली. अखेर या या प्रश्न वरिष्ठांशी चर्चा करतो असे सांगत आरटीओच्या ची पाटील व अन्य दोन अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!