“खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करण्यापेक्षा सत्तेचा वापर विकास कामासाठी करावा….” — सतीश गुरव

शिवसेनेचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांचेवर भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी टीका करण्यापेक्षा त्यांचेकडे असलेल्या सत्तेचा वापर त्यांनी जनतेच्या विकास कामासाठी करावा.अशी खरमरीत टीका खारेपाटण येथील कट्टर शिवसेना कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांनी “होऊ द्या चर्चा” या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पत्रके वाटप व बॅनर वॉर वर स्थानिक भाजप कार्यकर्त्याला प्रतिक्रिया देताना केली.
खारेपाटण गावासाठी खासदार श्री .विनायक राऊत साहेब यांच्या माध्यमातून १ कोटी ५६ लाखाचा निधी आजपर्यंत मिळाला आहे . तसेच सन्मानिय पक्ष प्रमुख श्री उध्वव बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना खनिजकर्म विभागातून माजी मंत्री श्री .सुभाष देसाई यांच्या माध्यमातून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला अँम्ब्युलन्स देण्यात आली . मागिल दिड वर्षापासून सत्ताबदल झाल्यापासून येणारा निधीच थांबला आहे .खारेपाटण बाजारपेठ रस्त्याला खासदारांच्या माध्यमातून २० लाख निधी मंजूर झाला होता. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या राजकिय मानसिकतेमुळे व नाकर्तेपणामुळे रस्ता यावर्षी होऊ शकला नाही . खारदारांवरती टिका करण्यापेक्षा स्थानिक भाजप कार्यकर्ते सुर्यकांत भालेकर यांनी खारेपाटणसाठी व गावच्या विकासाठी कसा जास्तीत जास्त निधी आणता येईल हे पहावे . तसेच आपली सत्ता आहे.त्यामुळे गेली बरीच वर्षे अपूर्ण राहिलेला खारेपाटण तालुका निर्मिती प्रश्न सत्तेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल याकडे लक्ष द्यावे .तसेच यापुढे खासदारांवरती विनाकारण टिका केल्यास सडेतोड व जशास तसे उत्तर देण्यात येईल असे देखील श्री सतीश गुरव यांनी सांगितले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!