कणकवली मतदार संघात पुन्हा एकदा राणेंचा विकासाचा धमाका!

मतदारसंघातील कामां करिता तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर

मतदारसंघातील 73 विकासकामे मंजुर

कणकवली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तब्बल 73 विकास कामे मंजूर झाली आहेत. 25 /15 या योजनेअंतर्गत ही विकास कामे मंजूर करण्यात आमदार नितेश राणे यांना यश आले असून, या संपूर्ण कामांसाठी एकुण 5 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. आतापर्यंत कणकवली मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आलेला असताना या निधीच्या माध्यमातून गावांमधील गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लागणार आहेत. यापूर्वी आलेल्या निधीमध्ये अजून 5 कोटींची भर टाकत पुन्हा एकदा निधी आल्याने कणकवली विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा व आमदार नितेश राणेंचा विकासाचा नवीन पॅटर्न उदयाला येत असल्याचे पहायला मिळत आहे.

दिगंबर वालावलकर/कणकवली

error: Content is protected !!