जानवली मध्ये भोकरे पोल्ट्री फार्म च्या टेम्पो चा अपघात

अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान

कणकवली तालुक्यातील जानवली बौद्धवाडी जवळ कोंबडी वाहतूक करणाऱ्या भोकरे पोल्ट्री फार्म च्या टेम्पोचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हा अपघात आज मंगळवारी सकाळी 6:30 च्या सुमारास झाला. यात काहींना गंभीर दुखापत झाली आहे. हा टेम्पो कणकवलीच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्या वर चढला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी हानी टळली.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!