श्री रामेश्वर वाचनमंदिर आचरा आयोजित चित्रकला स्पर्धेत साद शेख प्रथम

आचरा- श्री रामेश्वर वाचनमंदिर आचरा आयोजित आणि श्री. वामन रेडकर, श्री. विवेक सुखटणकर व श्री. प्रकाश महाभोज सर प्रायोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्र. साद शेख (इं. मि. स्कूल आचरा),द्वितीय क्र. जीवन मेस्त्री (हिर्लेवाडी प्रा. शाळा )तृतीय क्र. दिव्या गांवकर (इंग्लिश मि. आचरा )उत्ते.1 पलाश बिनसाळे (आचरा पिरावाडी शाळा )उत्ते 2 कौशल भोसले (न्यू इंग्लिश स्कूल आचरा) यांनी नंबर मिळविले आहेत.सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण 13 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी ठीक 3 वाजता वाचन मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे
आचरा–अर्जुन बापर्डेकर