रामेश्वर वाचनमंदिर येथे शुक्रवार 13 आक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन

आचरा श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराने प्रतिवर्षाप्रमाणे वाचन प्रेरणा दिनानिमित्त शुक्रवार दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता इयत्ता ४ थी ते ७ वी च्या विदयार्थ्यांसाठी ग्रंथभेट कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर ग्रंथभेट कु. नुर्वी गिरीश शेटगे( चोखंदळ बालवाचक पुरस्कार २०१७-१८ विजेती) यांजकडून देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात ग्रंथभेट दिलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळालेल्या ग्रंथातून कोणताही एक उतारा वाचून घेण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी वाचन प्रेमींनी उपस्थित राहून वाचन संस्कृती वाढीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाजी भिसळे व कार्यवाह श्री. अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!