सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 13 ऑक्टोबरला सावंतवाडीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

सावंतवाडी प्रतिनिधि
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी मधील रविंद्र मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यकर्ता मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात असून,
माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी केले आहे.