कलमठ ग्रामपंचायत कडून स्वच्छता ही सेवा अभियान

सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रा. प. सदस्यांची उपस्थिती

कणकवली/प्रतिनिधी.

स्वच्छता हीच सेवा, एक तास स्वच्छतेसाठी
या अभियाना अंतर्गत कलमठ गावातील गणपती सान्यावर ग्रामपंचायत वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी गणेश विसर्जन नंतर गणेश घाटावर असणारे प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य स्वाती नारकर, सुप्रिया मेस्त्री, नजराणा शेख ,विलास गुडेकर, कर्मचारी रमेश चव्हाण, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, महेंद्र कदम,ज्योती आमडोसकर,आशा सेविका विभावरी कांबळे, प्राची पवार, उपस्थित होते. यावेळी स्वच्छता समिती, आशा सेविका उपस्थित होते.

error: Content is protected !!