शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तवटे यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण.

सत्ता आणि संपत्ती चा वापर कायमच समाजहितासाठी करणारं व्यक्तिमत्व-डॉ पी जे कांबळे.
कणकवली/मयुर ठाकूर
ज्यांचे बालपण कष्टात जाते त्यांचे भावी आयुष्य उज्ज्वल होते . नागवे गावचे सुपुत्र श्री . दत्तात्रय तवटे साहेब यांचे जीवन चरित्र असेच आहे. नागवे गाव निसर्ग संपन्न आहे. पालकोबांचा आश्रय असलेला भला मोठा डोंगर गावाला लाभला आहे. खरंतर निसर्गच माणसांची जडणघडण करीत असतो . श्री तवटे साहेबांची सर्व घडण नागव्याच्या जन्म भूमिनेच केली . तिथली माती आणि ग्राम संस्कृती यांची पोषक तत्वे घेऊनच तवटे साहेब लहानाचे मोठे होत होते नागव्याची माणसं आणि बालपणातील संवंगडी यांच्या सोबतीने साहेबांचा आत्मिक आविष्कार घडत होता . माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनातला भूतकाळ भविष्याची जाणीव करून देतच असतो ही जीवन संपन्न करण्याची सर्व देणगी तवटे साहेबांना नागव्याचा जन्म भूमिनेच दिली म्हणून त्यांच्या जीवनात अनेक संकटे आणि दुःख आली तरीही जन्मभूमिच्या घट्ट संस्काराने ती आपोआप लोप पावत गेली कारण जीवनाची तपोभूमी घडविण्यासाठी माणसाला जशी सत् प्रवृत्तीची संगती हवी असते तशी आदर्श गुरु परंपरा ही नशिबानेच मिळावी लागते नागवे कणकवली आणि मुंबई असा प्रवास करत जीवनाची वळणे घेत घेत उच्च शिक्षणाच्या ध्येयापर्यंत पोहचणे तसे फार कठिण होते या काठी ण्यालाही मात करत उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न तवटे साहेब यांनी आपल्या कष्टातून आणि अथक प्रयत्नातून करून दाखविला हिच खरी त्यांच्या जीवनाची आत्मप्रवृतीची शिकवण होती . त्याच्या आई वडिलांच्या कष्टाळू स्वभावाचा परिणाम तवटे साहेबांच्याही जीवनात सहज उतरलेला दिसतो नागवे गावातील आदर्श कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या कुटुंबांचा एकतेचा प्रेमाचा आणि नात्यांचा वारसा वयाच्या अमृत महोत्सवी वर्षा पर्यंत कायम टिकून राहिला आहे.
माणूस वयाने नुसता वाढतो पण माणूसपणाचे संस्कार विसरतो तवटे साहेब संस्काराने आणि कर्तव्याने मोठे झाले त्याच्यातील गरीबीची जाणिव सतत जागी होत गेली म्हणून तवटे साहेबांच्या रुपाने समाज सेवक ‘ शिक्षण विषय विचारवंत जागा होत गेला . तवटे साहेब म्हणजे दानशूर व्यक्ती आणि प्रेमळ स्वभावाची व्यक्ती म्हणून आयुष्य भरभरून जगले . त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी अहंकार आणि गर्व कधिच निर्माण केला नाही सत्तेचा गैरवापर कधिच केला नाही सत्ता आणि संपती यांचा वापर समाज हितासाठी तवटे साहेब यांनी केला . हिंदूस्तान पेट्रोलियम या कंपनीचे सर्व श्रेष्ठ अधिकारी होऊन कंपनीला उंच शिखरावर साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने नेवून ठेवले . सामान्य माणसांची कदर करणारे तवटे साहेब यांनी आपल्या आयुष्यांत माणसं आणि नाती जपली . आनंदी स्वभाव निसर्ग भ्रमंती समाज प्रेम या गुणांनी तवटे साहेबांनी आपल्या आयुष्याचे सोने केले प्रकाशमान जीवन निर्माण करून उजळून टाकले .
आज साहेब अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत कुलदेवता ग्रामदेवता त्यांना उदंड आयुष्य देवो आरोग्य संपन्न जीवन लाभो . तवटे ‘ साहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
डॉ पी जे कांबळे
मुख्याध्यापक
विद्यामंदिर कणकवली . सिधुदुर्ग .