नाबार्ड अंतर्गत ३ कोटी ३४ लाख रु.मंजूर केलेल्या उपवडे येथील पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

मतदारसंघातील महत्वाची कामे वर्षभरात मार्गी लावणार -आ. वैभव नाईक, उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत थांबणार

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील अतिदुर्गम असलेल्या उपवडे गावात पुलाअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती.सदर पुलाच्या बांधणीसाठी मोठी रक्कम लागणार असल्याने पूल मंजुरीसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या मात्र आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून राज्य शासनामार्फत नाबार्डकडे या पुलाचा प्रस्ताव पाठवून दुकानवाड ते उपवडे रस्त्यावर उपवडे येथे मोठे पूल मंजूर करून घेतले. त्यासाठी नाबार्ड योजने अंतर्गत ३ कोटी ३४ लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
गेली अनेक वर्षे पावसाळ्यात याठिकाणच्या कमी उंचीच्या आणि जीर्ण झालेल्या जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने वाहतूक बंद होऊन गावाचा संपर्क तुटत होता. तसेच या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून ३ जणांचा मृत्यू झाला होता. उपवडे येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे नवीन पुलाची मागणी केली होती आता ही मागणी आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केली आहे.त्यामुळे उपवडे वासीयांची जीवघेणी कसरत आता थांबणार आहे. पूल मंजूर केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचा गावच्या वतीने सत्कार करत आभार मानण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कोणत्याही ठेकेदारासाठी किंवा कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर लोकांची उपयुक्तता आणि गरजेनुसार विकास कामे मंजूर करत आलो आहे. उपवडे गाव छोटा असला तरी पुलाच्या भूमिपूजनासाठी गावातील सर्वजण आले. यातून पुलाची गरज दिसून येते. असाच पुळास गावात साकव गरजेचा होता तो पूर्ण केला.आंबेरी येथील पूल देखील पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यात लोकांची अडचण होणार नाही. झाराप तिठा ते माणगाव तिठा या रस्त्यासाठी साडेपाच कोटी रु. मंजूर केले आहेत. लवकरच हे काम सुरु होईल. दुकानवाड येथील पूल देखील मंजूर करण्यात आला आहे. परंतु सरकार बदलल्यामुळे काही कामांना स्थगिती देण्यात आली त्यामुळे ते काम सुरु झाले नाही.हि स्थगिती उठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मतदारसंघात जी महत्वाची कामे आहेत ती येत्या वर्षभरात मार्गी लावली जाणार आहेत.असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी जी.प. सदस्य राजू कविटकर, माजी जी.प. सदस्य रमाकांत ताम्हणेकर, माजी उपसभापती श्रेया परब, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, घावनळे विभागप्रमुख रामा धुरी, वसोली ग्रुप ग्रा. प. सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस,हळदीचे नेरूर उपसरपंच गणपत परब, पुळास सरपंच सौ. निकम, बाळकृष्ण दळवी, विश्राम दळवी,संतोष राऊळ, महादेव राऊळ, गोपाळ सावंत, सखाराम पालकर, कृष्णा गवस, अनंत नाईक, विष्णू भरडे, दिनकर म्हाडगूत, महेंद्र राऊळ, यशवंत कदम, संतोष सावंत, सचिन पालकर, तुषार परब, श्रीकृष्ण नेवगी, पिंटू उबारे, प्रियांका परब, सुरेखा बांदेकर, दीक्षा तवटे, निवास कारुडकर, मीनाक्षी राऊळ, श्रीकृष्ण परब, कृष्णा पंदारे, दीपक नाईक, अरविंद राणे, आनंद शेडगे, वनिता सावंत अजित परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!