नारींग्रे येथे १३ फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

आचरा : नारींग्रे येथील जयंत भावे यांच्या निवासस्थानी सोमवार १३ फेब्रुवारी रोजी सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा१४५वा प्रकट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता विजय ग्रंथ पारायणास सुरुवात, दुपारी१०.४५ नंतर महापूजा,अभिषेक, लघरूद्र, महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्रौ
९.३०वाजता बुवा गुंडू सावंत विरूध्द बुवा विनोद चव्हाण यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन भावे कुटूंबाकडून करण्यात आले आहे.

अर्जुन बापर्डेकर / कोकण नाऊ / आचरा

error: Content is protected !!