सेवा आणी सुशासन हे पालकमंत्री यांचे धोरण

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सावंतवाडी – गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर रविंन्द्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अखत्यारीत कार्यरत असणारा सार्वजनिक बांधकाम विभाग एकजुटीने अहोरात्र मेहनत घेत विकासकामांना आकार देत आहे. जाहीर केल्याप्रमाणे मुंबई-गोवा सिंगल लेन महामार्ग पुर्ण झालेला आहे, त्यासोबतच आता गणेशभक्तांच्या सोयीसाठी आणखी एक उपक्रम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे, तो म्हणजे गणेश भक्तांसाठी उभारण्यात आलेली सुविधा केंद्रे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रायगड,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यात अशी अनेक केंद्रे कार्यरत झाली आहेत,होत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झाराप पर्यंत चार पॉईंट वर उभारण्यात आलेल्या स्वागत व सुविधा केंद्रातून सेवा सुरू झालेली आहे. या प्रशस्त अश्या सुविधा केंद्रामार्फत आरोग्यसेवा,पोलीस मदत केंद्र,मोफत चहा बिस्कीट स्टॉल,चालकांसाठी विश्रांती कक्ष,फोटो गॅलरी आणि मोबाईल शौचालय व्यवस्था इ. मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. जेणेकरून गणेशभक्तांच्या प्रवासातील थकवा कमी होईल,अपघात होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.
आपले पालकमंत्री रविंन्द्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.लाखो गणेशभक्त या सेवेचा लाभ घेतील. चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला उमेद करण्यासाठी टिकाकारांची फौज ही नेहमीच तैनात असते, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत काम करणे हा ही पालकमंत्री खासियत आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भाजप सेवा आणी सुशासन यावर भर देतो या विधानाला या उपक्रमातून पुष्टी मिळाली आहे.आज ओसरगाव टोल नाक्याजवळ उभारलेल्या सुविधा केंद्राला भेट दिली.तिथे भेट झालेल्या प्रवाश्यानी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.जिल्ह्यातील नागरिकांनी मुंबई पुण्याहून येणाऱ्या आपल्या आप्तेष्टना या सुविधा केंद्रांबाबत माहिती द्यावी असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!