कुणकेश्वर मंदिरामध्ये उद्योजक रुपेश सावंत,सुशांत नाईक यांच्या वतीने कुलर भेट

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

देवस्थान च्या वतीने मानले आभार

कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये मुंबई येथील उद्योजक रुपेश सावंत आणि युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांच्या वतीने देव कुणकेश्वर देवस्थान थंड पाण्याचा कुलर भेट देऊन त्याचे उद्घाटन युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुणकेश्वर मंदिरात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांना दिले.
युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक म्हणाले की,श्रावण सोमवारचे औचित्य साधून कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आले असता देवस्थान ट्रस्टच्या वतीने थंड पाण्याच्या कुलरची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडे करण्यात आली होती. परंतु तुम्ही जिल्हा बँकेचे सदस्य आहात तुमच्या माध्यमातून कुलरचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे केली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा बँकेकडून कुलर देणे शक्य झाले नसल्यामुळे ही सुविधा आठ दिवसात उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले. व त्या आश्वासनाची पूर्तता मुंबई येथील उद्योजक रुपेश सावंत व स्वतः थंड पाण्याचा कुलर आठ दिवसात उपलब्ध करून दिला. त्याबद्दल देवस्थान ने आभार देखील व्यक्त केले.
यावेळी खजिनदार अभय पेडणेकर,, सचिव शरद वाळके, सदस्य संजय आचरेकर, संतोष लाड, व्यवस्थापक रामदास तेजम, कुणकेश्वर माजी सरपंच गोविंद घाडी, ग्रामपंचायत सदस्य सायली वाळके ,शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल ,युवासेना तालुका अधिकारी गणेश गावकर ,फरीद काझी, उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, सरपंच दिनेश नारकर, संजय वाळके, ऍड सिद्धेश तुषार धुरी, विभाग प्रमुख गणेश वाळके, नगरसेवक विशाल मांजरेकर ,आदि शिवसैनिक उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!