विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने रुजविलेली हळदीची पाने,व्हॅन मालक आणि पालकांना देण्यात आली भेटवस्तु स्वरूपात.

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशालेचा उप्रक्रम.
कणकवली/मयुर ठाकूर.
बीज अंकुरे अंकुरे,ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे,माळराणी फुलतात.
या उक्तीप्रमाणे ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ निर्माण व्हावी,निसर्गाप्रतीचा जिव्हाळा वाढावा आणि निसर्गप्रेम जागृत व्हावे यासाठी यावर्षीच्या जुलै महिन्यात विज्ञान उपक्रमाअंतर्गत विविध फळभाज्या व औषधी भाज्यांच बी रुजत घालण्यात आलं होतं.अगदी दोन महिन्यातच विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला यश मिळाले आणि विविध प्रकारच्या फळभाज्या व औषधी भाज्यांची रोप प्रशालेच्या आवारात उगवली. विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने केलेला हा यशस्वी उपक्रम आहॆ.आवारात उगविलेल्या हळदीच्या झाडांची पाने, प्रशालेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या व्हॅन मालकांना आणि पालकांना गिफ्ट स्वरूपात देण्यात आली.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी राबविलेल्या या यशस्वी उपक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर टायशेटे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सचिव हरिभाऊ भिसे,सहसचिव श्री.महेंद्रकर,सल्लागार तानवडे सर मुख्याध्यापक अर्चना देसाई तसेच सर्व पालकवर्गाने अभिनंदन केले आहॆ.