मंत्रिमंडळाची कोकणात देखील बैठक आयोजित करा!

आमदार नितेश राणेंची कोकणातील मंत्र्यांकडे मागणी

मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित केली गेली. त्याच धर्तीवर कोकण मध्ये विकास निधी उपलब्ध होण्यासाठी व कोकणचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकणातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी कोकणामध्ये देखील मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. याबाबत मी लवकरच सरकारला पत्र लिहिणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!