ऐंन गणेश चतुर्थीच्यां तोंडावर मळगावला वाली कोण

सिध्देश तेंडोलकर यांचा प्रशासनाला सवाल
मळगाव सरपंच यांच्यावर अपात्र कारवाई झाल्यानंतर प्रशासनाने दखल घेवून ऐंन गणेश चतुर्थीच्या काळात कर्मचारी पगार, रस्त्याची झाडी मारणे, गणेश चतुर्थी बाजार नियोजन यासारख्या महत्वाच्या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. गटविकास अधिकारी सावंतवाडी यांनी याबाबतीत विशेष लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिध्देश तेंडोलकर यांनी केली आहे.
रामचंद्र कुडाळकर ।सावंतवाडी