गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

परतीच्या प्रवासासाठी देखील राहणार टोल माफी
संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहन धारकांना दिले जाणार पास
गणेशोत्सव कालावधीमध्ये कोकणात जाणाऱ्या वाहनांना तसेच परिवहन महामंडळाच्या एसटी ला देखील टोल माफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार याबाबतचा शासन आदेश पारित करण्यात आला आहे. याकरिता शासनाच्या माध्यमातून संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून वाहन चालकांनी पास घेणे गरजेचे असणार असून, यामध्ये परिवहन विभाग, पोलीस, आरटीओ आदी विभागाकडून हे पास देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परतीच्या प्रवासाकरता देखील हे पास ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता टोल मुक्त होणार असून, यामुळे चाकरमानी यांना हा दिलासा मिळाला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





