गणेश चतुर्थीच्या तोंडावर रंगरंगोटीसाठी गांगो मंदिर कडील अंडरपास बंद

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर अंडरपास खुला

गणेशोत्सवानंतर रंगरंगोटी चे काम करण्याचे आश्वासन

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कणकवली शहरातील रिंग रोड चा भाग असलेल्या मसूरकर किनाई रस्त्या समोरील गांगो मंदिर येथील अंडरपासच्या रंगरंगोटीचे काम आज पासून हाती घेण्यात आले. याकरिता गांगो मंदिर येथील अंडरपास वाहतुकी करिता बंद केल्याने येथे वाहन चालकांसह वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता. दरम्यान माजी नगरसेवक शिशीर परुळेकर यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गणेशोत्सव ची धामधूम सुरू असताना अशा प्रकारे रंगरंगोटी करून वाहतूकीचा खोळंबा करण्याची गरज काय? असा सवाल करत महामार्ग प्राधिकरणं च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच सदरचे काम तात्काळ बंद करा व गणेश चतुर्थी कालावधी संपल्यानंतर रंगरंगोटी करा अशी मागणी केली. त्यावर महामार्ग प्राधिकरण चे शाखा अभियंता साळुंखे व कांबळे यांनी तातडीने संबंधितांना सूचना देत गणेश चतुर्थी कालावधीत सदरचा अंडरपास रंगरंगोटी करता बंद न करता गणेश चतुर्थी संपल्यानंतर हे काम मार्गी लावा अशा सूचना दिल्या. याबद्दल सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!