“माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कळसुली मार्फत विविध स्पर्धा

सरपंच सचिन पारधीये यांच्या माध्यमातून करण्यात आले उद्घाटन
माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत शासनाच्या माध्यमातून दिलेल्या सूचनेनुसार कळसुली ग्रामपंचायत मार्फत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चित्रकला स्पर्धे सह अन्य स्पर्धांचा समावेश आहे. तसेच निबंध स्पर्धा, ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आल्या. दोन स्तरांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.
उपस्थित विद्यार्थ्यांसह सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच, सचिन पारधिये,
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, उपसरपंच, श्री गणेश मठकर, ग्रा.पं.सदस्य, सौ. मानसी दळवी, तंटामुक्त
अध्यक्ष, श्री प्रविण दळवी, केंद्रप्रमुख श्री राजेंद्रप्रसाद मणेरीकर, मुख्याध्यापक, श्री कृष्णा गांवकर, उपशिक्षक,
श्री टॉनी म्हापसेकर, श्री दिनेश सुद्रिक, उपशिक्षिका, श्रीमती निशा सातोसे, श्रीमती कदम, श्रीमती अर्चना पवार, तसेच
माजी तंटामुक्त अध्यक्ष, श्री दिलिप सावंत, श्री चंद्रकांत परब, यांचेसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी