अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांना सशर्थ जामीन

संशयित आरोपींच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
गोवा बनावटीच्या दारूची अनधिकृत वाहतूक करत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या स्वप्निल उर्फ मुन्ना वसेकर व शहाजी पठाण गायकवाड दोन्ही सोलापूर, याना कणकवली न्यायालयात हजर केले असता त्यांची सशर्थ जामीनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला. याबाबत दाखल फिर्यादीनुसार या संशयित आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार तसेच मुन्ना वसेकर याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीला ओसरगाव टोल नाका या ठिकाणी वाहनासह मुद्दे मला सहित ताब्यात घेण्यात आले. यामध्ये तपास कामात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पोलिस सांगतील त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणे या अटींवर संशयित आरोपींची प्रत्येकी 7 हजार 500 च्या जमिनीवर मुक्तता करण्यात आली.
कणकवली/ प्रतिनिधी