कुरंगवणे खैराटवाडी येथे बिबट्याने केला दोन शेळ्यांवर हल्ला

बिबट्याच्या मोकाट वावराने नागरिक भीतीच्या छायेत
कणकवली तालुक्यातील कुरांगवणे खैराट – भितिमवाडी येथील शेतकरी श्री राजेंद्र भितीम यांच्या मालकीच्या दोन शेळ्यावर बिबट्याने हल्ला करीत ठार मारल्या. ही घटना गुरवारी सायंकाळी ५.०० वाजता घडली.दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की श्री भितम यांच्या शेळ्या घराशेजारील जंगली भागात चरायला सोडल्या असता या परिसरात वावर असलेला व दबा धरून बसलेल्या बिबट्याने या दोन्ही शेळ्यावर हल्ला करीत त्यांना ठार मारले.यामुळे श्री भितम यांचे सुमारे ३०,०००/- रूपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना समजताच कुरगवणे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे पोलीस पाटील रत्न राऊत,यांनी घटास्थळाला तातडीने भेट दिली.यावेळी वनरक्षक अतुल खोत,बळीराम गोसावी,राजेंद्र भितम,दीपक भितम,अजित भितम आदी उपस्थित होते.
खारेपाटण पंचक्रोशीत सद्या बिबट्याने धुमाकूळ घातला असून या आठवड्यात बऱ्याच ठीकाणी शेतकऱ्यांच्या शेळा मेंढ्या तसेच पाळीव कुत्रे मांजरे व कोंबड्या यांच्यवर हलले केले असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी वन विभागाने मनुष्य वस्तीपर्यंत येऊन ठेपलेल्या या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण