विद्यामंदिर कणकवलीच्या आदित्य वनवे याची विभागीय अर्चरी (धनुर्विद्या)स्पर्धेसाठी निवड.

कणकवली/मयुर ठाकूर.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि.३१/०८/२०२३ रोजी क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित जिल्हास्तरिय शालेय अर्चरी स्पर्धेत कुमार-आदित्य अच्युतराव वनवे (१४ वर्षाखालील मुलगे)-प्रथम क्रमांक पटकावला आहे.आदित्यची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. अच्युतराव वनवे व श्री. सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.आदित्यचे संस्थेचे अध्यक्ष-श्री. दत्तात्रय तवटे, चेअरमन-डॉ. राजश्री साळुंखे, सचिव-मा.विजयकुमार वळंजू,संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक. पी.जे.कांबळे,पर्यवेक्षक-सौ.जाधव व्ही.व्ही. व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर वर्गानी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!