तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये निरवडे येतील संस्कार नॅशनल स्कूलचे घवघवीत यश

सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2023 -24 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भालाफेक या मैदानी स्पर्धेत संस्कार नॅशनल स्कूलच्या इयत्ता नववीतील विद्यार्थी कुमार दिपेश दत्तप्रसाद परब याने तृतीय क्रमांक पटकावला. या भरीव कामगिरीबद्दल प्रशालेचे चेअरमन श्री नरपत जैन सर ,श्री शेखर जैन सर ,कमिटी सदस्य श्रीमती श्रावणी प्रभू मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हेमंत तानावडे सर,प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती ॲलिस्का अल्मेडा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी कौतुक व अभिनंदन केले.
क्रीडा क्षेत्रात प्राविण्य संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशालेचे चेअरमन श्री नरपत जैन व शेखर जैन सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले

error: Content is protected !!