विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष गणपती रंगकामाचा अनुभव.

विद्यामंदिर कणकवली प्रशालेचा उपक्रम.
कणकवली/मयुर ठाकूर
विद्यामंदिर हायस्कूलच्या पर्यावरण सेवा योजना या विभागामार्फत योजना प्रमुख श्री प्रसाद राणे यांनी आज शनिवार दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी प्रशालेतील पर्यावरण सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना व अन्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणपती बाप्पा कशाप्रकारे तयार करावेत आणि ते रंगवून पूर्ण कसे करावेत याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रतीवर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा पूर्णपणे तयार झालेले गणपती बाप्पा आणले जातात हे पाहिलेलं असत पण प्रत्यक्षात गणपतीची मूर्ती कशा प्रकारे घडावली जाते हे माहिती नसत विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून देण्यासाठी पर्यावरण पूरक मातीचा गणपती कसा तयार करावा तो पूर्णत्वास कसा आणावा आणि त्यानंतर त्याच्यावरती रंगकाम कसं करावं मग त्याच्यामध्ये पहिला पांढरा रंग त्यानंतर अंगाचा रंग त्यानंतर शेला व धोतर यांचा रंग त्याच्यानंतर त्याची शेडींग , त्याची लेखणी म्हणजे डोळ्याचं काम आणि सोनेरी काम म्हणजे मुकुट ज्वेलरी हे सर्व रंगकामाचे टप्पे पूर्ण करून प्रत्यक्ष मूर्ती कशाप्रकारे तयार केली जाते याचा अनुभव प्रात्यक्षिकासह मुलांनी आज प्रशालेमध्ये घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात गणपती बाप्पा कसे तयार होतात हे बघता आलं ह्या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर आणि पर्यवेक्षक सौ तांबे मॅडम यांच मोलाचे सहकार्य लाभल त्याचबरोबर या उपक्रमासाठी पृथ्वीराज बर्डे सर व NCC चे विद्यार्थि यांचेही मोलाचे सहकार्य लाभल. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या घरी यावर्षी पर्यावरण पूरक गणपती बाप्पाच आणणार अशी प्रतिज्ञा घेतली