खारेपाटण येथील ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा कार्यकर्ते तेजस राऊत यांनी घेतली खासदार विनायक राऊत यांची सदिच्छा भेट

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील युवा सेना कार्यकर्ते श्री तेजस राऊत व खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक श्री सतीश गुरव यांनी नुकतीच मुंबई येथे शिवसेना पक्षाचे खासदार मा.विनायक राऊत यांची सदिच्छा भेट घेतली.व खारेपाटण विभागातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा माजी जिल्हा प्रमुख सतीश सावंत तसेच खारेपाटण विभगातील काही युवा सेना कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना युवा कार्यकर्ते तेजस राऊत व सामजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्या माध्यमातून खारेपाटण येथे येत्या दहीकाला उस्तवाच्या निमित्ताने भव्य रकमेची दहीहांडी बांधण्यात येणार असून या दहीहंडी उस्तवाला खासदार विनायक राऊत यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे देखील युवा सैनिक तेजस राऊत यांनी यावेळी सांगितले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण