सावंतवाडीतील साडी सेलमध्ये कणकवलीतील व्यापाऱ्यांची उपस्थिती!

कणकवलीतील व्यापाऱ्यांकडून या सेलला करण्यात आला होता विरोध
कणकवलीतील काही व्यापाऱ्यांचा सावंतवाडी च्या सेल मधील व्हिडिओ व्हायरल
कणकवलीत वादग्रस्त ठरलेला साडी सेल सावंतवाडी सुरू झाल्यानंतर सावंतवाडी मधील सुरू असलेल्या सेलमध्ये आज शनिवारी कणकवलीतील काही व्यापाऱ्यांनी उपस्थिती लावली. कणकवलीतील कापड व्यापाऱ्यांकडून या सेलला विरोध झाला होता. या सेल मुळे स्थानिक व्यापारांचे नुकसान होणार असा आक्षेप स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर सावंतवाडीत देखील या सेलला काही प्रमाणात विरोध झाला. तरीही हा सेल सुरू आहे. येत्या 29 ऑगस्ट पासून हा सेल कणकवली सुरू होत असताना या सेल करिता कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी परवानगी दिली. त्यामुळे जवळपास आता हा सेल सुरू होणार हे निश्चित असतानाच आज कणकवलीतील काही व्यापाऱ्यांनी या सेलमध्ये उपस्थिती लावली. यांच्याकडून काही साहित्याची खरेदी झाली का? हे स्पष्ट झाले नसले तरी याबाबतचा व्हिडिओ सध्या कणकवलीत जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता या सेल ची उत्कंठा अजून वाढीस लागली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली