कुडाळमध्ये उद्या श्रावणमेळा

कुडाळ पं स. चे आयोजन
मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत उपक्रम
पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह अनेकांची उपस्थिती
प्रतिनिधी । कुडाळ : पंचायत समिती कुडाळच्या वतीने यावर्षी मेरी मिट्टी मेरा देश या समर्पित भावनेतून मातृभुमी को नमन वीरों को वंदन करणारा श्रावणमेळा कार्यक्रम उद्या गुरुवार 24 ऑगस्टला सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत .रानभाज्या प्रदर्शनासह पाककलाकृतीमध्ये 700 प्रकार असणार आहेत तसेच रक्तदात्यांची बँक असणारा महाराष्ट्र राज्यातील पहिला अँप लाँच असणारा कुडाळ तालुका पंचायत समिती ठरणार आहे या सोहळ्याला पालकमंत्री रविद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती आहे अशी माहिती पाणी पुरवठा स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.
श्री.ठाकूर व श्री चव्हाण म्हणाले की, पंचायत समिती गेली तीन वर्षे श्रावणमेळा कार्यक्रम घेत आहे. सुरूवातीला कोविड काळात ज्यांच्या चुली पेटत नव्हत्या. पोटाची खळगी भरत नव्हती अशा वयोवृद्ध लोककलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या चेह-यावर आनंद खुलवण्याचा प्रयत्न केला होता तर मागील वर्षी समाजातील विधवा महिलांसाठी तु चाल पुढे… मिशन वात्सल्य हा कार्यक्रम घेतला होता. यावर्षीचा मेरी मिट्टी मेरा देश या समर्पित भावनेतून मातृभुमी को नमन विरों को वंदन – करणारा कार्यक्रम होत आहे.मातृभुमीबद्दल आदर व्यक्त करणेसाठी या रानभाज्यांचे प्रदर्शन व त्यापासून विविध पाककलाकृती तयार करून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश आहे.
निसर्गाचा उतराई होण्याचा एक प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाव्दारे आम्ही वसुधेला वंदन करतो. यात अंदाजे किमान 700 पाककृती सादर होणार आहेत. देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या विरांनी बलिदान दिले. देशाच्या सीमांचे रक्षण करणेसाठी प्राणांची आहुती देणारे सैनिक मातृभूमीप्रति अपार प्रेम दाखविणारी समूहगीते समूह नृत्ये कुडाळ तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुले सादर करणार आहेत.आपली मातृभूमी म्हणजेच भारत देश विविध राज्ये जिल्हे तालुका-गावांनी बनलेला आहे. प्रत्येक गावातील चिमुटभर मृदा देशाच्या राजधानीत जाणार आहे. देशातील विविध जात-धर्म-प्रांत, भाषा एकतेने नांदत आहेत.
कुडाळ तालुक्यातील 68 ग्रामपंचायतीतील 122 गावांतून प्रत्येक गावांतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त दोन महिला आपल्या गावातील प्रातिनिधीक मृदा समारंभपूर्वक पंचायत समिती कुडाळ येथे एका अमृत कलशामध्ये गोळा करणार आहेत व हा मृदेचा अमृत कलश समारंभपूर्वक देशाची राजधानी दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण 351 तालुके आहेत व या राज्यातील कुडाळ तालुका एकमेव असा तालुका आहे की ज्यातील सर्व 122 महसुली गावे स्वच्छतेमधील ODF++, MODEL एवढेच नाही तर FIVE STAR झालेली असून संपूर्ण तालुका स्वच्छतेमधील FIVE STAR घोषित करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात एकमेव तालुका स्वच्छतेमधील FIVE STAR घोषित होणे ही बाब आपल्या जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी गौरवास्पद बाब ठरणार आहे.
एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या वतीने 1000हुन जास्त जणाची आरोग्य तपासणी झाली आहे रक्तदाते निर्माण झाले आहेत या रक्तदात्याची बँक असणारे अँप लॉन्च होणार आहे असे अँप लाँच करणारा कुडाळ तालुका राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे
या सोहळ्याला पालकमंत्री रविंद्र चव्हाण शालेय मंत्री दीपक केसरकर आम वैभव नाईक जिल्हाधिकारी किशोर तावडे जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी सरपंच यांची उपस्थिती आहे
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.