कणकवलीत अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ

भजने,चित्ररथ व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

काशीविश्वेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन

शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात बुधवार पासून अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. बुधवार २९ ऑगस्टपर्यंत मंदिरात धार्मिक विधींसह भजनांचा कार्यक्रम आणि शहरातून दिंड्या व चित्ररथ देखावे काढले जाणार आहे. सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात बुधवारी सकाळी घटस्थापना करण्यात आली. घटाची ब्रह्मवृंदांनी विधिवत केली. त्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी विठ्ठल नामाच्या गजर करण्यात आला. यावेळी विविध पारांचे प्रमुख, गावचे मानकरी तसेच भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी पटकीदेवी मित्रमंडळ यांनी दिवस जागवला. त्यानंतरचे हरिनाम सप्ताहाचे दिन वितरण पुढील प्रमाणे दुसरा दिवस गुरुवार ढालकाठी मित्रमंडळ, तिसरा दिवस शुक्रवार आंबेआळी मित्रमंडळ, चौथा दिवस शनिवार जुना मोटर स्टँड, मारुतीआळी, पाचवा दिवस बिजलीनगर मित्रमंडळ, सहावा दिवस सोमवार महापुरुष मित्रमंडळ, सातवा दिवस मंगळवार तेलीआळी मित्रमंडळ तर बुधवार ३० रोजी कणकवली शहरात नगरप्रदक्षणा व दुपारी महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. सतत सात दिवसाच्या कालावधीत मंदिरात रात्री चित्ररथ दिंडी व भरगच्च भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव काशीविश्वेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!