शिर्डी येथे १७ ऑगस्ट पासून श्री साईसच्चरित पारायण सोहळा
ब्युरो । शिर्डी : सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा शिर्डी येथे श्रावण महिन्यात श्री साई साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि नाट्यरसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने यंदा गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट ते गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट या कालावधीत हा श्री साईसच्चरित पारायण सोहळा होणार आहे.यंदाचे हे पारायणाचे २९ वे वर्ष आहे. साई आश्रम नं १ (१००० रूम) नगर-,मनमाड रोड येथे हा सोहळा होणार आहे. पुरुषांसाठी परयाणाची वेळ सकाळी ७ ते ११.३० आणि महिलासाठी पारायणाची वेळ दुपारी १ ते सायंकाळी ५ अशी आहे. या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्यात दरवर्षी श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाचे कलाकार आपली कला सादर करतात. यंदा देखील या कलाकारांचा कार्यक्रम शिर्डी येथे होणार आहे. या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचा लाभ साई भक्तानी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, शिर्डी.