वालावलमध्ये संगीत विद्यालयाचा शुभारंभ

प्रतिनिधी । कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल या देवस्थान समितीने वालावल पंचक्रोशीतील संगीत प्रेमी व युवा पिढी साठी संगीत विद्यालयायाचा शुभारंभ रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी करण्यात आला. यावेळी झी मराठीवर नव्याने येणाऱ्या ‘सार काही तिच्यासाठी’ या मालिकेचे कलाकार व काॅरीयोग्राफर,व इतर मान्यवर उपस्थित होते.
या श्री देव लक्ष्मीनारायण संगीत विद्यालयामध्ये पेटी, तबला, मृदुंग व शास्त्रीय गायन शिकविले जाणार आहे. यासाठी प्रमुख मार्गदर्शक शिक्षक म्हणून योगेश प्रभू संगीत विशारद व आनंद मौर्य मृदुंग विशारद म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. दर रविवारी सायंकाळी 3 ते 5.30 यावेळेत शिकविले जाणार आहे. तर मुलांना रियाज करण्यासाठी मृदुंग, तबला व हार्मोनियम पेटी संगीत विद्यालयात ठेवण्यात येणार आहे.
श्री देव लक्ष्मीनारायण संगीत विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी झी मराठीचे विनोद नाईक, योगेश प्रभू, आनंद मौर्य,वालावल मधील आधुनिक प्रगतशील शेतकरी प्रसाद प्रभू, संगीत विद्यालय सुरु करण्यासाठी विशेष मेहनत घेणारे प्रविण आडेकर, वालावल गावचे संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेले दिनेश वालावलकर, श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उपसमिती वालावलचे विश्वस्त संदीप साळसकर, एकनाथ वालावलकर, लक्ष्मण देसाई, तसेच कर्मचारी आकाश मठकर, दिपक वालावलकर तसेच ग्रामस्थ सचिन वालावलकर, मंजूनाथ फडके उपस्थित होते.
या संगीत विद्यालयात 20 मुलांनी प्रवेश घेतला आहे. ज्या मुलांना व संगीत प्रेमीना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल यांच्याशी संपर्क साधावा. फोन नंबर 02362-242028,9421416150,9421076064 असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण देसाई यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.