निष्कलंक महान विभूती म्हणजे एकनाथजी ठाकूर – प्रा. अरुण मर्गज

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथ ठाकूर यांना आदरांजली
प्रतिनिधी । कुडाळ : राजकारणामध्ये राहून सुद्धा तत्त्व व मूल्य यांच्याशी तडजोड न करता समाजाभिमुख राजकारण करता येत ;याचा आदर्शभूत वस्तुपाठ म्हणजे स्वर्गीय एकनाथजी ठाकूर होय. राजकारणामध्ये आपल्या बुद्धीच्या व निष्कलंक चारित्र्याच्या जोरावर लोकआदरास पात्र झालेले एकनाथजी ठाकूर त्यांचं जीवन चरित्र हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. गरीबी आणि परिस्थिती माणसाला त्याच्या स्वप्नांच्या पूर्तते पासून रोखू शकत नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथजी ठाकूर यांचं जीवन चरित्र होय. असे गौरवोद्गार बॅरिस्टर नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले. बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आज एकनाथजी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी प्रा. अरुण मर्गज बोलत होते.
यावेळी विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथजी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बॅरिस्टर नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, बॅ.नाथ पै ज्यु. कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोसकर, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या च्या प्रिया केटगाळे, प्रसाद कानडे, श्रीम.रिद्धी पाताडे विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. अरुण मर्गज पुढे म्हणाले, गरीब कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा बुद्धीच्या, प्रामाणिकपणाच्या व सचोटीपूर्ण जीवनाच्या आधारे उत्तम नावलौकिक कमावता येतो .हे एकनाथजी ठाकूर यांच्या उदाहरणातून दिसून येते. अशिया खंडातील एक नंबरची सहकारी बँक ठरलेली बॅंकस्थापून समाजसेवा केली .एवढेच नव्हे तर मराठी मुलांसाठी बँकेची दारे खुली करणारी, नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग नावाची संस्था स्थापन करणारी व लोकोपयोगी- समाजोपयोगी कारणांसाठी खासदार निधीचा योग्य विनियोग करणारी महान व्यक्ती: असा गौरव माजी खासदार तथा सारस्वत बँकेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी ठाकूर यांचा करण्यात आला.
“एकनाथी ठाकूर यांचे जीवनच हे सर्वांसाठी एक उत्तम संदेश ठरू शकतो आणि अशांच्या विचारांवर, अशांच्या शिकवणीवर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था वाटचाल करत आहे .असे सांगत त्यांच्या तत्त्वांचा त्यांच्या मूल्यांचा आणि त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे काम बॅ.नाथ पै शिक्षण संस्था करत आहे .ते आमचे आदर्श आहेत.”असे उद्गार शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.