पाट हायस्कूलमध्ये कुडाळ इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

प्रतिनिधी । कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्.एल देसाई विद्यालय व कै. सौ. एस .आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयात उत्कर्षा आणि हरित सेना उपक्रमांतर्गत ‘कुडाळ इनरव्हील क्लबच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
प्रशालेमध्ये उत्कर्षा उपक्रमांतर्गत दरवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये 3 जुलै ,2023 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कुडाळ इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.संजना काणेकर, डॉ. सायली प्रभू ,सौ. पद्मा वेंगुर्लेकर, डॉ.सौ.उज्ज्वला सावंत ,सौ.ऋतुजा परब, सौ .स्वप्नाली साळगावकर, सौ. चित्रा बोभाटे ,सौ. प्रीती तायशेटे, संस्था खजिनदार माननीय श्री. देवदत्त साळगावकर, माननीय श्री, अवधूत रेगे ,प्रशालेचे पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर उत्कर्षा उपक्रम प्रमुख सौ. अंकिता मोडक या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेतील वृक्षलागवडीची माहीती घेतली विविध उपक्रम जाणून घेतले.
प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका अंकिता मोडक यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले .सर्व मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी प्रशालेत वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षक .राजन हंजनकर व आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.