स्वातंत्र्यदिनी प्रकल्पग्रस्त कुडाळ न.प. समोर बसणार उपोषणाला

वेंगुर्लेकरवाडी, कुंभारवाडीतील नागरिकांचा इशारा

प्रतिनिधी । कुडाळ : येथील वेंगुर्लेकरवाडी आणि कुंभारवाडीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नळ कनेक्शनधारक यांनी स्वातंत्र्यदिनी कुडाळ नगर पंचायत समोर उपोषणाला बसणायचा इशारा दिला आहे. वेंगुर्लेकर वाडीतील ज्येष्ठ नागरिक विलास पावसकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात होणार आहे, असे या वाडीतील नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, आम्ही कुडाळ वेंगुर्लेकर आणि कुंभारवाडीतील लोक आपदाग्रस्त व प्रकल्प ग्रस्त आहोत. आम्हाला सवलतीच्या दरात MIDC पाणी देते. परन्तु ग्रामपंचायतचे नगर पंचायत रुपांतर झाल्यामुळे ते कारण पुढे करून ऊपविधीच्या नावाने आम्हा कनेक्शनधारकांवर वाढीव बील आमच्या माथी मारत आहेत.
खरे आम्ही ग्रामस्थ शासनाच्या 4 प्रकल्पग्रस्त आहोत. 1 वायमन गार्डन, 2 M S E B, 3 – M I D C. 4 – कोकण रेल्वे त्याचबरोबर इतर जी शेतीसाठी जमीन होती त्यावर नगर पंचायत प्रशासनाने ग्रीन झोन लावला आहे. त्यामुळे कस जगावं हा प्रश्न आता ग्रामस्थासमोर आहे. याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणुन आम्ही परीसरातिल शेतकरी प्रकल्पग्रस्त कनेक्शनधारक येत्या 15 ऑगस्ट मंगळवार 2023 सकाळी 8 वाजता आमच्या वाडीतिल ज्येष्ठ नागरिक विलास पावसकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसत आहोत.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!