अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली कुडाळ प.स. परिसर सफाई

मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत उपक्रम
प्रतिनिधी । कुडाळ : “मेरी मिट्टी, मेरा देश अभियान” अंतर्गत पंचायत समिती मधील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या वतीने संपूर्ण परिसर साफसफाई करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
पंचायत समिती कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या संकल्पनेतुन “मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत पंचायत समितीचा संपुर्ण परिसर साफसफाई करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उस्फ्रूर्त सहभाग घेत संपुर्ण परिसर स्वच्छ व सुंदर केला. यावेळी कर्मचाऱ्यानी स्वतः हातात फावडे, टोपली खराटा घेवून पंचायत समितीचा परिसर साफसफाई करण्याचा निर्धार करून, या लाल मातीची आपण लेकरे असल्याचा संदेश देत हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विजय चव्हाण, कक्ष अधिकारी श्रीम. मृणाल कार्लेकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री.नंदकुमार धामापूरकर,कृषी अधिकारी श्री. प्रफुल वालावलवर, श्री.बाळकृष्ण परब, विस्तार अधिकारी पंचायत श्री. रामचंद्र जंगले, विस्तार अधिकारी श्री. खरात, श्री. दत्ताराम आबेरकर, तसेच विस्तार अधिकारी मंगेश जाधव तसेच अन्य अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केलेला आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.