कुडाळ पं.स. च्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत भरगच्च कार्यक्रम

९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत कुडाळ तालुका पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या वतीने ९ते १५ऑगस्ट या कालावधीत मेरी मिट्टी मेरा देश, या शीर्षकाखाली विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ११ व १२ऑगस्टला मातृभुमीला नमन ,वीरांना वंदन अंतर्गत तालुक्यात सहा बीट स्तरावर समूह नृत्य व समूहगीत स्पर्धा घेण्यात येणार आहे हजारो मुले या स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्यांचे स्मरण करण्यासाठी तसेच स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या शुरवीरांना नमन करण्यासाठी हा कार्यक्रम आहे स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अशा शुर वीरांना जन्म देणारी आपली भारतमाता खरच महान आहे . अशा महान भुमीत आपण जन्मलो हे आपले भाग्यच आहे. भारत मातेसाठी माती हातात घेऊन देशासाठी स्वताला समर्पित करण्याची शपथ घेऊन शिला फलकाचे समर्पण, पंचप्रण शपथ, वसुधा वंदन, वीरोंको वंदन अमृत वाटिका, अमृत कलश असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात ” मिट्टी यात्रा ” काढली जाणार आहे ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत देशभक्तीपर गीत , तिरंगा यात्रा, आयोजित करून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे.११ व १२ ऑगस्टला बीट स्तरावर समूह नृत्य समूह गीत स्पर्धा घेण्यात येणार आहेत मातृभुमी व वीरांच्या प्रती आजच्या विद्यार्थ्यामध्ये देशाभिमान जागरूक झाला पाहिजे आज गेली कित्येक वर्षे सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत , आनंदीमय जीवन जगत आहोत या भावना आजच्या युवकांमध्ये रुजल्या पाहिजेत या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत पाचवी ते बारावीपर्यंतच्या 30 हायस्कूलमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत यामधे वालावल बीटची स्पर्धा कलेश्वर विद्यामंदिर नेरूर, कुडाळ बीट बॅरिस्टर नाथ पे शिक्षण संस्था एमआयडीसी, वाडोस बीट वाडोस हायस्कूल ,माणगाव बीट माणगाव हायस्कूल, कडावल बीट भडगाव हायस्कूल, अणाव बीट कसाल हाय स्कूल येथे होणार आहेत या स्पर्धेची जबाबदारी तेथील सरपंच शिक्षण विभाग केंद्रप्रमुख यांच्याकडे देण्यात आली आहे हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.