आमच्या मुंबई-गोवा हायवेच सार कामच बिघडलं- प्रमोद धुरी बुवांनी गायलेला गजर पुन्हा चर्चेत.
गजरातून मांडली चाकरमाण्यांची व्यथा.
नाही कधीही कुठेच मोर्चा,नाही आंदोलन…
शांत संयमी कोकणी माणूस करी कायद्याचे पालन….
दुःख सोसलं गप्प राहुनी,कधी नाही कुठे मागल….
आमच्या मुंबई गोवा हायवेच सार कामच बिघडलं.
कणकवली/मयुर ठाकूर.
नाही कधीही कुठेच मोर्चा,नाही आंदोलन…
शांत संयमी कोकणी माणूस करी कायद्याचे पालन….
दुःख सोसलं गप्प राहुनी,कधी नाही कुठे मागल….
आमच्या मुंबई गोवा हायवेच सार कामच बिघडलं.
अश्या आशयाच्या गजराची रचना कोकणातील प्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद धुरी यांनी काही महिन्यापूर्वी केली होती.हा गजर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलाच शेअर होत असून सर्वत्र गजराची चर्चा सुरु आहॆ.खरतर भजनातील गजराच्या माध्यमातून समजप्रबोधन भजन मंडळी करत असतात. सुमारे गेली 10 ते 12 वर्षे मुंबई गोवा हायवेच काम हे बिघडलेल्या अवस्थेत आहॆ. कोकणातील मुंबईस्थित चाकरमणी आणि रोजचे प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहॆ. सध्या तर पावसाच्या दिवसांमध्ये सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य पसरल आहॆ. आणि अश्या अवस्थेत यां मार्गाने प्रवास करणं हे जीवावर बेतणार झालं आहॆ.
ही सारी कोकणवासियांची व्यथा प्रमोद धुरी यांनी आपल्या गजराच्या माध्यमातून मांडली आहॆ.साक्षात गजराच्या रूपात ईश्वराचरणी घातलेला हे साकडं आहॆ,की यां हायवेच काम लवकरात लवकर पूर्ण होउदे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात नवनवीन भजनी बुवांची भजन कॅसेट च्या माध्यमातून प्रसिद्ध होतात.नवनवीन गाण्यांची निर्मिती भजनी बुवा करीत असतात त्यात धुरी बुवांचा हा गजर पुन्हा एकदा चर्चेत आला आहॆ.
कोकणी माणसाने आजवर मोठ्या स्वरूपात मोर्चे काढले नाही, आंदोलन केली नाहीत पण असे असले तरी हा शांत संयमी कोकणी माणूस आहॆ त्याचा अंत पाहू नका….. असा संदेशच जणू या गजराच्या माध्यमातून धुरी बुवांनी सरकार च्या दरबारी पोहोचवला आहॆ.
कोकणात गणेश चतुर्थी निमित्त लाखो चाकरमांनी गावी येतात,निदान या उत्सवापूर्वी तरी या रस्त्याच काम प्रवासायोग्य होईल अशी अपेक्षा आहॆ.