साटेली भेडशीत मालवाहू ट्रक चिखलात रुतला

साटेली भेडशी येथील वरच्या बाजारात उभ्या करून ठेवलेल्या चौदा चाकी मालवाहू ट्रकची चाके चिखलात रुतल्याने ट्रक फसला.त्यात माल भरलेला असल्याने तो उजव्या बाजूने कलंडला होता; मात्र तो सुदैवाने पलटी न झाल्याने अपघात टळला.सार्वजानिक बांधकाम विभाग बाजूपट्टी मजबुतीकरणाकडे लक्ष न दिल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वाहने बाजूपट्टीवर फसण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
त्या ट्रकमध्ये सुमारे तीस टन तेल होते.ते घेऊन तो ट्रक काल आला होता; पण संबंधित दुकानदाराने तो माल आज उतरून घ्यायचा असल्याने ट्रक थांबवून ठेवायला सांगितले होते.चालकाने तो ट्रक खानयाळे फाट्याच्या अलिकडे मुख्य रस्त्यात उभा करून ठेवला होता; मात्र वजनाने त्याची चाके रुतली आणि तो फसला.नंतर त्यातील माल दुसऱ्या गाडीत घालून नेण्यात आला.

प्रतिनिधी l दोडामार्ग

error: Content is protected !!