शिष्यवृत्ती परीक्षेत शमिका शिशिर परुळेकर गुणवत्ता यादीत

शमिका हिच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूर्व माध्यमिक च्या वतीने नुकत्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्तीच्या परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत उर्सुला ची आठवितील विद्यार्थिनी शमिका शिशिर परुळेकर हिला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शमिका हिने यश मिळवले असून, इंग्रजी माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने उज्वल यश संपादन केले आहे. तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली