मळगाव येथे १५ जुलै रोजी गुरु अभिवादन सोहळा
![](https://kokannow.in/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Image-2023-07-13-at-9.44.59-AM.jpeg)
श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजन
संगीत श्रोत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
सावंतवाडी : श्री सद्गुरू संगीत विद्यालय (संचालक संगीत अलंकार श्री दिप्तेश मेस्त्री) च्यावतीने तळवडे, कुडाळ, सावंतवाडी, म्हापसा गोवा, न्हावेली गुरुकुल आदी क्लासचा एकत्रित गुरु अभिवादन सोहळा शनिवार १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मळगाव येथील भगवती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे राजगुरू राजेंद्रस्वामी भारती महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक श्री दिप्तेश मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर पाहुण्यांची ओळख, स्वागत, विद्यार्थ्यांचे गायन, दुपारी गुरु अभिवादन सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. अधिक माहितीसाठी दिप्तेश मेस्त्री- ९४२२३२८५९२ व अजित पोळजी-९७६४९२२६२७ यांच्याशी संपर्क साधावा. वरील सर्व क्लासच्या विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरु संगीत विद्यालयाचे संचालक श्री दिप्तेश मेस्त्री यांनी केले आहे.