सावंतवाडी पत्रकार संघातर्फे जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांचा सत्कार

शासनाच्या पत्रकार अधीस्वीकृती समितीवर गजानन नाईक यांची निवड

कोल्हापूर विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या सदस्य पदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव पत्रकारांनी वेळेत देणे आवश्यक आहे. तसेच उद्भवणाऱ्या त्रुटींविषयी चर्चा करून त्या कशा दूर करता येतील व अधिकारी पत्रकारांना कशाप्रकारे संधी देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जेष्ठ पत्रकार तथा पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या नियुक्ती केल्या असून कोल्हापूर विभागाच्या अधीकस्विकृती समितीवर सावंतवाडीचे जेष्ठ पत्रकार गजानन राजाराम नाईक यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे गजानन नाईक यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देताना नाईक यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्विकृती प्राप्त करण्यासाठी संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना सावंतवाडी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांचे अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. नाईक यांची या समितीवर निवड झाल्यामुळे सावंतवाडीसह जिल्हा पत्रकार संघालाही सन्मान प्राप्त झाला आहे. आपल्या हक्काचा माणूस या समितीवर असल्यामुळे स्थानिक पत्रकारांना अधिकृति प्राप्त करण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या डिजिटल विभागाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, विजय देसाई, विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, राजू तावडे यांनीही नाईक यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार तथा वितरक विजय माधव यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. स्वागत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार तर आभार खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, जिल्हा डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, विजय देसाई, प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, नरेंद्र देशपांडे, पत्रकार उमेश सावंत, सचिन रेडकर, रुपेश हिराप, दीपक गांवकर, विनायक गांवस, रामचंद्र कुडाळकर, जतिन भिसे, सचिन मांजरेकर, अशोक बोलके, सिद्धेश सावंत, भूवन नाईक, विजय माधव आदी उपस्थित होते.

सावंतवाडी । प्रतिनिधी

error: Content is protected !!