जाळ्यात अडकलेल्या माकडाच्या पिल्लाला जिवदान

आचरा वरचीवाडी येथील बंगल्याच्या टेरसला सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या वानराच्या पिल्लाला प्राणी मित्र स्वप्नील गोसावी व महेश मेस्त्री यांनी जिवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. आचरा वरचीवाडी येथील मारुती मंदिर रोड येथील बंगल्याच्या टेरसला सुरक्षेसाठी लावलेल्या नायलॉन जाळीत सोमवारी सायंकाळी वानराचे पिल्लू अडकल्याचे शेजारील रहिवासी महेश मेस्त्री यांच्या नजरेस पडले.याबाबत ची माहिती सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांना फोनवरुन सांगितल्यावर तातडीने धाव घेत त्याची जाळ्यातून मुक्तता करुन नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी महेश मेस्त्री, दाजी गावकर,भाई गावकर दिपा मेस्त्री आदी सहभागी झाले होते.






