सांगिर्डे येथे डास प्रतिबंधक फवारणी आणि वृक्षारोपण संपन्न

मंदार शिरसाट आणि अमित राणे यांचा पुढाकार

सांगिर्डेवाडी कुडाळ येथे वाढता मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ व अमित राणे यांच्या स्वखर्चाने मच्छर प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर भूजल पातळी वाढावी यासाठी वृक्षारोपण मोहिम राबवण्यात आली या मोहिमेला सांगिर्डे वासियानी उत्सपुर्त प्रतिसाद दिला
ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम राहावे आणि पर्यावरण संतुलन राखले जावे, या उद्देशाने आज सांगिर्डे येथे डास प्रतिबंधक फवारणी आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सांगिर्डे वाडीतील घरोघरी आणि पाण्याचे साठे असलेल्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. या धूर आणि औषध फवारणीमुळे डासांच्या उत्पत्तीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. डास प्रतिबंधक फवारणीसोबतच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता या झाडांचे पुढील संगोपन करण्याची ग्वाही घेण्यांत आली
या प्रसंगी नगरसेवक मंदार शिरसाठ, संतोष शिरसाठ, बबल बोभाटे, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, बाळा पावसकर, गुरु गडकर, रोहन शिरसाठ, सागर भोगटे, प्रथमेश राणे, शैलेश काळप, सांगिरडे शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, वालावलकर मॅडम, दशरथ राणे, विलास राणे, अर्जुन परब, प्रदीप राणे, सुधीर परब, संतोष सडवेलकर, तुषार कासेकर, विशाल राणे, दीपक राणे, चैतन्य महाडेश्वर, तौसीफ जमादार व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!