ग्रामपंचायत तर्फे केंद्र शाळा आचरेला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन प्रदान

आचरा ग्रामपंचायत तर्फे केंद्र शाळा आचरा नं १ला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यां किशोरी आचरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, वरिष्ठ लिपिक नरेंद्र परब, केंद्र शाळेचे सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!